आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे. देवस्थानात पिण्याच्या पाण्याची सोय आहे बघून आश्चर्य वाटले. आम्ही जेव्हा देवस्थानात पोहचलो तेव्हा मंदिराच्या दाराला कुलूप होते. आम्ही बाहेर उभे राहून दर्शन घेतले. तेवढ्यात पुजारी आले आणि आम्हाला आत बोलावून दर्शन घ्यायला लावले. ऑगस्ट महीन्याच्या २५ तारखेला मंदिरात गोपाल काला आणि महाप्रसाद आहे तेव्हा आपण सर्वांनी यावे असे सांगून त्या कार्यक्रमाची पत्रिका देखील दिली. परिसरात मारोती ची देखील मूर्ती आहे. सर्व देवांना मनोभावे नमस्कार करून हळूहळू चढण उतरायला सुरुवात केली.
' बस्तर ची सफर' बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो ! मागच्या महिन्यात एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले. बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा