मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मोबाइल चा कैदी

पूर्वी लोक सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यायचे. आता मात्र डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलचे दर्शन घेतले जाते. देवाला नमस्कार नंतर, पण मोबाईलची बॅटरी किती आहे हे आधी पाहिले जाते! जणू काही मोबाईल हा घरातील सर्वात लाडका सदस्य झाला आहे. आजकाल मोबाईल हरवला तर माणूस एवढा घाबरतो की जणू त्याची अर्धी दुनिया हरवली आहे. पण घरातल्या चाव्या, चष्मा किंवा पाकीट हरवले तर तो शांतपणे शोधत बसतो. मोबाईल सापडेपर्यंत मात्र चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. "अरे, कुणी माझा मोबाईल पाहिलाय का?" हा प्रश्न दिवसातून किमान तीन वेळा तरी घरात ऐकू येतो. जेवताना देखील आता थाळीपेक्षा मोबाईलकडेच जास्त लक्ष असते. एका हातात पोळी आणि दुसऱ्या हातात मोबाईल. मध्येच एखादा व्हिडिओ इतका मजेशीर लागतो की घास तोंडातच थांबतो. आई म्हणते, "जेवण कर!" आणि मुलगा म्हणतो, "हो... हा शेवटचा रील!" पण तो "शेवटचा रील" कधीच संपत नाही. मोबाईलमुळे आणखी एक मजेशीर प्रकार सुरू झाला आहे. पूर्वी लोक भेटले की विचारायचे, "कसे आहात?" आता मात्र विचारतात, "Wi-Fi चा पासवर्ड काय आहे?" काही पाहुणे त...
अलीकडील पोस्ट

आयुष्याचे मोफत टॉनिक

  आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण इतका व्यस्त झाला आहे की हसण्यासाठीही वेळ काढावा लागतो. पूर्वी लोक "काय म्हणताय?" असे विचारायचे, आता "ऑनलाइन आहात का?" असे विचारतात. मोबाईलने जग जवळ आणले, पण शेजाऱ्यांना मात्र दूर नेले! एकदा आमच्या मित्राने ठरवले की रोज सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करायचा. पहिल्या दिवशी गजर झाला. त्याने गजर बंद केला आणि म्हणाला, "आरोग्य महत्त्वाचे आहे... पण झोप त्याहून महत्त्वाची!" दुसऱ्या दिवशी गजर वाजलाच नाही, कारण रात्रीच त्याने तो बंद करून ठेवला होता. आता तो अभिमानाने सांगतो, "मी मनःशांतीचा व्यायाम करतो!" घरातही असेच मजेदार प्रसंग घडत असतात. आई म्हणते, "जरा बाजारातून कोथिंबीर घेऊन ये." मुलगा विचारतो, "ऑनलाइन मागवू का?" बाबा म्हणतात, "आमच्या काळात आम्ही पायी जायचो." त्यावर मुलगा उत्तर देतो, "आमच्या काळात आम्ही ॲप वापरतो!" पिढ्यांमधला हा संवाद ऐकून आजी फक्त हसत बसते. मोबाईलचेही काही कमी नाही. आपण फक्त वेळ पाहायला फोन हातात घेतो आणि दहा मिनिटांनी आठवते की आपण फोन उघडलाच कशासाठी होता!...

वेळेचे महत्त्व

 वेळ ही माणसाच्या जीवनातील सर्वात मौल्यवान आणि अमूल्य संपत्ती आहे. पैसा, संपत्ती, वस्तू किंवा इतर साधने हरवली तर ती पुन्हा मिळवता येतात, परंतु एकदा निघून गेलेली वेळ कोणत्याही परिस्थितीत परत मिळवता येत नाही. म्हणूनच वेळेचा योग्य वापर करणे आणि तिचे महत्त्व समजून घेणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला असता त्यांच्या यशामागे वेळेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते. त्या व्यक्ती आपली दैनंदिन कामे ठराविक वेळेत पूर्ण करतात, प्राधान्यक्रम ठरवतात आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना आपली उद्दिष्टे गाठणे सोपे जाते. दुसरीकडे, वेळ वाया घालवणारी व्यक्ती अनेक चांगल्या संधी गमावते आणि नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्त्व विशेषतः अधिक असते. नियमित अभ्यास, खेळ, वाचन, विश्रांती आणि इतर उपक्रम यांचे योग्य नियोजन केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. परीक्षेच्या काळात वेळेचे योग्य नियोजन करणारे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे परीक्षा...

बस्तरची सफर

  ' बस्तर ची सफर' बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो ! मागच्या महिन्यात  एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले.  बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क...

एका ट्रीपची गोष्ट..

         एका ट्रीपची गोष्ट..   त्यावेळी मी राजस्थान येथील चित्तोडगढ येथे नोकरीला होतो. जवळपास तीन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे ही, मी आणि माझ्या मित्राने (संजय व संगिता राजावत) सहकुटुंब एका रविवारी येथील प्रसिद्ध श्री  नाथद्वार देवस्थाना  जवळ असणाऱ्या वॉटर फॉल ला ट्रिप म्हणून एका रविवारी जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही  दोन्ही परिवार सकाळी लवकर उठून जय्यत तयारीने मित्राच्या कारने निघालो. बरेच दिवसात घराच्या बाहेर निघालो असल्याने मस्त आनंद लुटत प्रवास सुरू होता. नाथद्वार देवालयाचे दर्शन परत येताना घेऊ असे ठरले.वॉटरफॉल ला ११वाजता  पोहचलो. वॉटरफॉलचा नजारा अप्रतिम होता. वॉटरफॉल मध्ये जावून आंघोळीसाठी जाण्यासाठी  सगळी तयारी अर्थात कपडे वगैरे घेऊन  व गाडी लॉक करून वॉटर फॉल च्या खाली पोहोचलो. तिथे दोन तास  थंड गार पाण्याचा आनंद घेतला. तिथून बाहेर पडूच नये असे वाटत होते. शेवटी अंगावरील  ओलं चिंब कपड्यांनी  गाडी जवळ पोहचलो. मित्राने गाडी उघडण्या करिता जसा पायजमा च्या खिशात हात टाकला तर त्याच्या  लक्षात आले की कारची च...

आनंद सहल

आनंद सहल  आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर  ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाड...

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास  स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या  ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो. निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते. 'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्...