आपले जीवन समृद्ध, सुसंस्कृत आणि विचारांनी परिपूर्ण बनविण्यात वाचन संस्कृतीची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. पुस्तके ही ज्ञानाचा अमूल्य खजिना असून ती माणसाला नवीन विचार, अनुभव आणि प्रेरणा देतात. वाचनामुळे केवळ माहितीच मिळत नाही, तर विचार करण्याची क्षमता वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मोठी मदत होते. आजच्या युगात मोबाईल, इंटरनेट आणि सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुस्तक वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसते. माहिती मिळविण्याची साधने वाढली असली तरी पुस्तकांचे महत्त्व अजूनही अबाधित आहे. कोणतेही तंत्रज्ञान पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही. पुस्तकांमधून मिळणारे सखोल ज्ञान, अनुभव आणि जीवनमूल्ये माणसाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. वाचनाची सवय मुलांना लहानपणापासून लावावी त्यामुळे त्यांची अर्थात विद्यार्थ्यांची भाषाशैली सुधारते, शब्दसंग्रह समृद्ध होतो आणि अभ्यासातही चांगली प्रगती होते. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो. इतिहास, विज्ञान, साहित्य, चरित्रे, आत्मचरित्रे आणि प्रवासवर्णने यांसार...