मुख्य सामग्रीवर वगळा

आनंद सहल

आनंद सहल 
आज रविवार ..सुटीचा दिवस असल्यामुळे कुठे तरी बाहेर फिरून येण्याचा बेत ठरला,तसा ४-५ दिवसांपासून पाऊस देखील पडेनासा झाला असल्याने नागार्जुन देवस्थान, अंबाळा, रामटेक गडमंदीर आणि नगरधन किल्ला बघून यावे असे ठरले. सकाळी ७.३० वाजता आम्ही घरून निघालो. ९.३० ला मनसर  ला पोहचलो,तिथे गरमागरम चहा घेऊन नागार्जुन मार्गे पुढचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या तासात नागार्जुन देवस्थान ला पोहचलो. देवस्थान बरेच उंचावर असल्याकारणाने तिथे दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या जवळपास ३५० असून सर्व उभ्या धाटणीच्या आहेत, त्यामुळे चढतांना बरीच दमछाक होते. चढतांना दोहो बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. जसं जसं आपणं वर चढत जातो तसा वारा देखील वाहत असतो, त्यामुळे आलेला थकवा आणि घाम क्षणात विरून जातो,परत नव्याने चढण्यासाठी स्फूर्ती येते. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर दुरून मंदिराचे दर्शन होते. तेव्हा पाऊले आपसूकच उत्साहाने पुढे पडत असतात. चढतांना आपण किती पायऱ्या चढलो यांचे भान राहत नाही परंतु उतरतांना आठवणीने पायऱ्या मोजल्या. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत देवस्थानच्या परिसरात पोहचलो. आजूबाजूचा परिसर हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे. देवस्थानात पिण्याच्या पाण्याची सोय आहे बघून आश्चर्य वाटले. आम्ही जेव्हा देवस्थानात पोहचलो तेव्हा मंदिराच्या दाराला कुलूप होते. आम्ही बाहेर उभे राहून दर्शन घेतले. तेवढ्यात पुजारी आले आणि आम्हाला आत बोलावून दर्शन घ्यायला लावले. ऑगस्ट महीन्याच्या २५ तारखेला मंदिरात गोपाल काला आणि महाप्रसाद आहे तेव्हा आपण सर्वांनी यावे असे सांगून त्या कार्यक्रमाची पत्रिका देखील दिली. परिसरात मारोती ची देखील मूर्ती आहे. सर्व देवांना मनोभावे नमस्कार करून हळूहळू चढण उतरायला सुरुवात केली. 
निसर्गाच्या सान्निध्यात कधी खाली उतरलो कळलेच नाही. नंतर रामटेक ला श्री रामाचे दर्शन घ्यायला गडमंदिराकडे आमचा प्रवास सुरू झाला. आज ऊन फार होते त्यामुळे गडमंदिराच्या पायऱ्या चढतांना घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. गडमंदिरावर पायऱ्या पायऱ्या वर खूप माकडे असतात त्यांच्या करीता आठवणीने फुटाणे विकत घेतले. आधी श्री लक्ष्मणाचे दर्शन घेवून नंतर श्री रामाचे दर्शन घेतले. थोडा वेळ रामझरोक्याला बसून गडमंदिराच्या पायऱ्या उतरून जवळ असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये घरून आणलेल्या डब्यावर ताव मारला. गर्मीचा त्रास होत होता पण भुकेपोटी तो जाणवला नाही. जेवण झाल्यावर थोडा वेळ अंबाळ्याला जावून आलो आणि नंतर २०० वर्ष जुन्या नगरधन च्या किल्ल्याला भेट दिली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बस्तरची सफर

  ' बस्तर ची सफर' बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो ! मागच्या महिन्यात  एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले.  बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क...

मोबाइल चा कैदी

पूर्वी लोक सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यायचे. आता मात्र डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलचे दर्शन घेतले जाते. देवाला नमस्कार नंतर, पण मोबाईलची बॅटरी किती आहे हे आधी पाहिले जाते! जणू काही मोबाईल हा घरातील सर्वात लाडका सदस्य झाला आहे. आजकाल मोबाईल हरवला तर माणूस एवढा घाबरतो की जणू त्याची अर्धी दुनिया हरवली आहे. पण घरातल्या चाव्या, चष्मा किंवा पाकीट हरवले तर तो शांतपणे शोधत बसतो. मोबाईल सापडेपर्यंत मात्र चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. "अरे, कुणी माझा मोबाईल पाहिलाय का?" हा प्रश्न दिवसातून किमान तीन वेळा तरी घरात ऐकू येतो. जेवताना देखील आता थाळीपेक्षा मोबाईलकडेच जास्त लक्ष असते. एका हातात पोळी आणि दुसऱ्या हातात मोबाईल. मध्येच एखादा व्हिडिओ इतका मजेशीर लागतो की घास तोंडातच थांबतो. आई म्हणते, "जेवण कर!" आणि मुलगा म्हणतो, "हो... हा शेवटचा रील!" पण तो "शेवटचा रील" कधीच संपत नाही. मोबाईलमुळे आणखी एक मजेशीर प्रकार सुरू झाला आहे. पूर्वी लोक भेटले की विचारायचे, "कसे आहात?" आता मात्र विचारतात, "Wi-Fi चा पासवर्ड काय आहे?" काही पाहुणे त...

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास  स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या  ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो. निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते. 'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्...