मुख्य सामग्रीवर वगळा

एका ट्रीपची गोष्ट..

        एका ट्रीपची गोष्ट.. 

त्यावेळी मी राजस्थान येथील चित्तोडगढ येथे नोकरीला होतो. जवळपास तीन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे ही, मी आणि माझ्या मित्राने (संजय व संगिता राजावत) सहकुटुंब एका रविवारी येथील प्रसिद्ध श्री  नाथद्वार देवस्थाना  जवळ असणाऱ्या वॉटर फॉल ला ट्रिप म्हणून एका रविवारी जाण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही  दोन्ही परिवार सकाळी लवकर उठून जय्यत तयारीने मित्राच्या कारने निघालो. बरेच दिवसात घराच्या बाहेर निघालो असल्याने मस्त आनंद लुटत प्रवास सुरू होता. नाथद्वार देवालयाचे दर्शन परत येताना घेऊ असे ठरले.वॉटरफॉल ला ११वाजता  पोहचलो. वॉटरफॉलचा नजारा अप्रतिम होता. वॉटरफॉल मध्ये जावून आंघोळीसाठी जाण्यासाठी  सगळी तयारी अर्थात कपडे वगैरे घेऊन  व गाडी लॉक करून वॉटर फॉल च्या खाली पोहोचलो. तिथे दोन तास  थंड गार पाण्याचा आनंद घेतला. तिथून बाहेर पडूच नये असे वाटत होते. शेवटी अंगावरील  ओलं चिंब कपड्यांनी  गाडी जवळ पोहचलो. मित्राने गाडी उघडण्या करिता जसा पायजमा च्या खिशात हात टाकला तर त्याच्या  लक्षात आले की कारची चावी वॉटर फॉल मध्ये पडली होती. लगेच आम्ही दोघे पुन्हा तिथे   जाऊन खूप शोधाशोध केली पण व्यर्थ.  काही फायदा झाला नाही. परत गाडी जवळ आलो, आता आम्हाला भूखही सपाटून लागली होती आणि अंगावरील कपडे ओले असल्याने  थंडी सुद्धा वाजत   होती. सोबत आणलेले जेवणाचे  डबे गाडी मध्ये होते आणि गाडीची चावी हरवली होती. फार बिकट परिस्थिती होती. आता पर्यंत दुपारी चे ३ वाजायला आले होते. तिथे आलेल्या सहप्रवाशांना  विचारपूस केली पण काही फायदा झाला नाही. माझ्या मित्राने आणि मी जवळच्या  गावा मध्ये जाण्याचे ठरविले. आम्ही दोघे तसल्या स्थिती मध्ये बनियन आणि पायजमा ने २ किमी. दूर गावा मध्ये गेलो व mechnic चा शोध घेतला.  शेवटी खूप विचारपूस केल्यावर  एक सज्जन  गृहस्थ येण्यासाठी तयार झाला ( देव पावल्या सारख वाटलं). त्या माणसांनी एक लोखंडी strip ने गाडीचा एक दरवाजा उघडला. त्या नंतर आम्ही सर्वानी कपडे बदलविले आणि जेवण केले . त्यावेळी संध्याकाळचे  ५ वाजले होते. पोटोबा शांत झाला होता, पण सर्वात मोठी  चिंता होती ती गाडी सुरू करण्याची. चित्तोडगढ ला घरी जावून गाडीची चावी आणणे म्हणजे फार वेळ लागणार होता.  ऑफिस लोकांना देखील कळवले, शेवटी उदयपूरला एका   Mechanic चा फोन नंबर मिळाला. उदयपूर या ठिकाणावरून  १०० किमी दूर होते. तिथे असेलेल्या mechanic ला विचारून बघितले, तो तयार झाला पण फार पैसे मागत होता.  कसातरी वाटाघाटी करून तो तयार झाला. तो येत पर्यंत आम्ही सगळे  त्याची वाट  पाहत राहिलो.  तोपर्यंत वॉटर फॉल ला आलेले सगळेजण निघून गेले होते. आम्ही फक्त  चौघे जण तिथे  होतो. येव्हाणा बराच अंधार पसरला होता   व रात्रीची वेळ  असल्याने आम्हा सगळ्यांना वन्य पशूंची भीती देखील वाटत होती. हनुमान चालीसाचे व देवदेवतांचे स्मरण सुरू होते. श्री नाथद्वारा ला जावून सकाळी दर्शन घेतले नव्हते म्हणून असे घडते आहे असे वाटले. आता  त्याठिकाणी  अंधार वाढत चालला होता. शेवटी रात्री ८.३० ला उदयपूर वरून Mechanic आला आणि एक तासात गाडी ची नवीन चावी तयार करून दिली. सगळ्यांनी देवाचे व त्या Mechanic  चे आभार मानले. नंतर आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात श्री श्री नाथद्वाराला मनोमन नमस्कार करून घरी रात्री  ११.३० पर्यंत  सुखरूप पोहोचलो. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बस्तरची सफर

  ' बस्तर ची सफर' बरेच दिवसांपासून बस्तर, छत्तीसगढ़ येथे जाण्याचे मनात होते, त्यामागील कारणही तसेच होते. मी नुकताच इयत्ता ४ ची उत्तिर्ण झालो होतो. माझ्या आजोबा जगदलपूर येथे नोकरीला होते. जगदलपूर त्यावेळी मध्यप्रदेशात येत होते, आता ते छत्तीसगड मध्ये येते. आजोबा मला जगदलपूर ला सोबत घेऊन गेले. तिथेच त्यांनी माझा दाखला ५ व्या इयत्तेत केला. त्यामुळे ५ वी चे शालेय शिक्षण जगदलपूर येथे झाले. नंतर मी माझ्या गावी लोधीखेड्याला परत आलो. त्यावेळ पासून मला जगदलपूर आणि आजुबाजूच्या परिसर मला खूपच आवडला होता. बरे असो ! मागच्या महिन्यात  एक ट्रॅव्हल कंपनीची बस्तर टूर करिता जाहिरात बघितली आणि त्यांचे सोबत जाण्याचे नक्की केले.  बस्तर पावसाळ्यात बघण्याची मजा काही औरच असते. पावसाळी दिवस असल्याने सर्वांनी सोबत रेनकोट,छत्री आणि कॅप जवळ बाळगण्यास सांगितले होते. सगळी तयारी करता करता जाण्याचा दिवस येऊन ठेपला. वंदेभारत ट्रेन जायचे असल्यामुळे सोबत डबा वैगेरे घेऊन जाण्याची गरज नव्हती कारण ट्रेन मध्ये जेवण आणि चहा मिळतो. ११ जुलैला दुपारी २ वाजता वंदेभारत एक्सप्रेस ने जायचे होते. आम्ही सर्व प्लॅटफॉर्म क...

मोबाइल चा कैदी

पूर्वी लोक सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यायचे. आता मात्र डोळे उघडताच सर्वप्रथम मोबाईलचे दर्शन घेतले जाते. देवाला नमस्कार नंतर, पण मोबाईलची बॅटरी किती आहे हे आधी पाहिले जाते! जणू काही मोबाईल हा घरातील सर्वात लाडका सदस्य झाला आहे. आजकाल मोबाईल हरवला तर माणूस एवढा घाबरतो की जणू त्याची अर्धी दुनिया हरवली आहे. पण घरातल्या चाव्या, चष्मा किंवा पाकीट हरवले तर तो शांतपणे शोधत बसतो. मोबाईल सापडेपर्यंत मात्र चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे असतात. "अरे, कुणी माझा मोबाईल पाहिलाय का?" हा प्रश्न दिवसातून किमान तीन वेळा तरी घरात ऐकू येतो. जेवताना देखील आता थाळीपेक्षा मोबाईलकडेच जास्त लक्ष असते. एका हातात पोळी आणि दुसऱ्या हातात मोबाईल. मध्येच एखादा व्हिडिओ इतका मजेशीर लागतो की घास तोंडातच थांबतो. आई म्हणते, "जेवण कर!" आणि मुलगा म्हणतो, "हो... हा शेवटचा रील!" पण तो "शेवटचा रील" कधीच संपत नाही. मोबाईलमुळे आणखी एक मजेशीर प्रकार सुरू झाला आहे. पूर्वी लोक भेटले की विचारायचे, "कसे आहात?" आता मात्र विचारतात, "Wi-Fi चा पासवर्ड काय आहे?" काही पाहुणे त...

इतिहास :पोळा मारबत, नागपूर

 नागपुरातील मारबतीचा इतिहास  स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना चिडविण्यासाठी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली. प्रामुख्याने मस्कासाथ, इतवारी तसेच जागनाथ बुधवारी या  ठिकाणाहून काळी आणि पिवळी अशा दोन मारबती निघतात. या दोन्ही मारबती नेहरू पुतळा चौकात एकत्र येतात. मारबतींमधील बडग्या हा विशेष चर्चेचा विषय असतो. ज्या गोष्टींचा निषेध करायचा आहे,त्याचा बडग्या या मारबतींसोबत असतो. निषेध करण्यासाठी  'घेऊन जा गे मारबत' हा नारा दिला जातो. पुढे मारबतींसोबतच सर्व बडग्यांचे  नाईक तलाव येथे दहन केले जाते. 'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्...